कुछ दिलने कहा..

जुनी हिन्दी गाणी हा पूर्वीपासुनचा जिव्हाळ्याचा विषय. मित्रांशी चर्चा करताना माझ्याकडुन याबाबत तरी गाण्याच्या बाबतीत किंवा गायक गायिकेच्या बाबतीत पक्षपात होतोच. मात्र “कुछ दिलने कहा” वर वाद घालावासा वाटत नाही इतकं ते गाणं भावतं. लताच्या आवाजातले या गाण्याचे आर्त सुर कानावर आले की क्षणभर सारंकाही विसरुन मन भूतकाळात जातं. मला तर का कुणास ठावूक पण…

अपालूसा

अगदी नवीन असे वेस्टर्नपट मला फारसे मानवत नाहीत. हा माझा मागासलेपणा असेल पण कठोर अशा निसर्गाशी जुळतील असे रापलेले चेहरेच आता दुर्मिळ झालेत. तो हेन्री फोंडा नाही, जॉन वेन नाही, चार्लस ब्रॉन्सन नाही आणि रँडॉल्फ स्कॉटही नाही. मात्र “अपालूसा” हा याला सणसणीत अपवाद. तसा हा पारंपरिक वेस्टर्न चित्रपट म्हणता येणार नाही. यात ती कुरणे नाहीत.…