किरातार्जुनीयम् चे देणे

संस्कृतातील अनेक नाटकांमधल्या अनेक गोष्टी आवडतात हे खरे असले तरी भारविच्या किरातार्जुनीयम् नाटकातील अकरावा सर्ग हा माझ्या फार आवडीचा आहे. मानसशास्त्राचा अभ्यास सुरु केल्यावर तर तो मला नुसता आवडीचाच नाही तर पुन्हा पुन्हा वाचण्याजोगा वाटू लागला आहे. आपण एखादी चांगली गोष्ट सुरु केल्यावर आपल्या समोर येऊन आपल्याला हतोत्साह करणारी अनेक माणसे असतात. काहीजण काळजीच्या नावाखाली…

गॉडफादर आणि सोशल कॅपिटल

समाजशास्त्राचा विद्यार्थी असल्याने सामाजिक अंगाने चित्रपटांचा अभ्यास करणे ओघानेच आले. अशावेळी काही क्लासिक चित्रपटांमध्ये समाजशास्त्रातील सिद्धान्तांची बीजं मिळाली. ती तशी मिळणे ही घटना रोचक आणि आनंददायी होती. मग आपोआपच अभ्यासामुळे समाजशास्त्राच्या खुणा चित्रपट पाहताना शोधल्या जाऊ लागल्या. अर्थातच चित्रपटाच्या लेखक दिग्दर्शकाचा समाजशास्त्राचा अभ्यास असेल असे नाही या गोष्टीची मला जाणीव होती. मात्र या कलाकारांचा समाजाचा…

मै दिल हूं इक अरमान भरा…

समाजशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून इतिहासकाळापासून जगात जे महत्वाचे बदल झाले त्यांचा आम्हाला अभ्यास करावा लागतो. म्हणजे भटक्या जमाती हळूहळू कमी झाल्या. लोक शेती करायला लागले. एका जागी स्थिर झाले. पुढे विज्ञानाचे युग आले, कारखानदारी सुरु झाली. जूने जग नाहीसे होऊ लागले. हिन्दी चित्रपटाचा इतिहास पाहू गेल्यास असेच बदल दिसू लागतात. अमिताभ युग सुरु होताना आद्य…

One Flew Over the Cuckoo’s Nest – पॉवर आणि फॉल्स काँन्शसनेस

चित्रपट आणि समाजाचा घनिष्ठ संबंध असतो. समाजात घडलेल्या अनेक गोष्टींचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असते. पण काही चित्रपट हे अगदी एखाद्या शास्त्राच्या कसोटीवर घासून पुसून पाहता येतात. त्या चित्रपटात ओळखीच्या अनेक खुणा सापडतात. जॅक निकलसनचा One Flew Over the Cuckoo’s Nest पाहताना हे वारंवार जाणवत होते. चित्रपट म्हणून त्यात एक झपाटून टाकणारी कथा आहेच. पण त्याही…

गळा मोती एकावळी काळी वो माय…!

एकदा नवरात्र असताना मंडपातून दुरून, अस्पष्टसे गाण्याचे स्वर ऐकू आले, “रात्र काळी, घागर काळी, यमुनाजळी ही काळी वो माय”. आवाज स्पष्ट नसल्याने ओरिजनल गाणे लावले आहे की नाही ते ओळखु शकलो नाही. मात्र चित्राने मूळ वस्तुची आठवण यावी त्याप्रमाणे गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकरांच्या या गाण्याने मन भूतकाळात निघून गेले. माझं काही गाण्यांनी असं होतं.…

एका सीन बद्दल – जॅक निकलसन आणि ओम पुरी – वोल्फ

लांडग्याने चावलेल्या माणसाचे पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण लांडग्यात रुपांतर होणे ही कथाही तशी चावून चोथाच झालेली आहे. पण अशा माहित असलेल्या कथांना दिग्दर्शक “ट्रिटमेंट” कशी देतो हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते रसायन जर नीट जमलं तर जबरदस्त चित्रपट बनतो. जॅक निकलसनच्या “वोल्फ” ची गणना त्याच्या ग्रेट चित्रपटांमध्ये कुणी करीत असेल असे वाटत नाही पण मला…

मर्यादांचे भान

अलिकडेच काही कामासाठी विद्यापिठात गेलो होतो. आमचे समाजशास्त्राचे प्राध्यापक भेटले. ते निवृत्त झाले होते. ते ही काही कामासाठी आले असावेत. ते आपल्या गाडीत आणि मी बाहेर असा काहीकाळ सुखसंवाद झाला. अतिशय कडवे मार्क्सवादी असलेले सर आता काहीसे निराश वाटत होते. जीवनाला अर्थ नाही. आपण त्याला जो देऊ तोच अर्थ आणि तो देखील बरोबर असेलच असं…

You can’t handle the truth…

सत्तेचं सामर्थ्य हाताशी असलं आणि एका अर्थाने absolute Power आपल्याकडे असेल तर व्यक्ती धोकादायक होते हे अनेकदा सार्वजनिक जीवनात दिसून आलं आहे. सत्ता आणि प्रांजळपणा, सचोटी, नम्रता यांचं जणू वैरच असावं. “फ्यु गुड मेन” या चित्रपटात जॅक निकलसनने साकारलेला कर्नल जेसप हे अशा व्यक्तीचे उत्तम उदाहरण. कर्नल जेसप हा करडा सेनानी त्याच्या हाताखालील सैनिकाकडून आगळीक…

लास्ट मॅन स्टँडिंग – You’re dead and you don’t know it.

अकिरा कुरोसोवाचा युजिंबो पाहायला मिळाला नाही. मात्र त्यावर बेतलेले चित्रपट अनेकवेळा पाहिले. त्यातला एक चित्रपट म्हणजे सर्जियो लियॉनोचा इतिहास घडवणारा क्लिंट इस्टवूड अभिनित “फिस्टफूल ओफ डॉलर्स”. पुढे ओळीने “फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर” आणि “द गुड, द बॅड अँड द अग्ली” हे सर्जिओचे आणखि दोन चित्रपट आले. आज वेस्टर्न पटात या तीन क्लासिक गणलेल्या चित्रपटांना…

कुछ दिलने कहा..

जुनी हिन्दी गाणी हा पूर्वीपासुनचा जिव्हाळ्याचा विषय. मित्रांशी चर्चा करताना माझ्याकडुन याबाबत तरी गाण्याच्या बाबतीत किंवा गायक गायिकेच्या बाबतीत पक्षपात होतोच. मात्र “कुछ दिलने कहा” वर वाद घालावासा वाटत नाही इतकं ते गाणं भावतं. लताच्या आवाजातले या गाण्याचे आर्त सुर कानावर आले की क्षणभर सारंकाही विसरुन मन भूतकाळात जातं. मला तर का कुणास ठावूक पण…