दिल ढुंढता है फिर वोही फुरसत के रात दिन…
काही गाण्यांचे संगीत अशा तर्हेने दिलेले असते की माणुस आपोआपच गतकाळच्या स्मृतीत जातो. आणि चित्रपटातली सिच्युएशनही तशीच असेल तर मग पाहायलाच नको. त्यातही गुलजारसारखा कवि आणि दिद्गर्शक असेल, शर्मिलाटागोर आणि संजीवकुमारसारखे कसलेले कलाकार असतील, लता आणि भुपेंद्रसारखे गायक असतील आणि मदनमोहनसारखा संगीतकार असेल तर गाण्यात काय काय चमत्कार घडू शकतील हे पाहायचं असेल तर १९७५…