दिल ढुंढता है फिर वोही फुरसत के रात दिन…

काही गाण्यांचे संगीत अशा तर्‍हेने दिलेले असते की माणुस आपोआपच गतकाळच्या स्मृतीत जातो. आणि चित्रपटातली सिच्युएशनही तशीच असेल तर मग पाहायलाच नको. त्यातही गुलजारसारखा कवि आणि दिद्गर्शक असेल, शर्मिलाटागोर आणि संजीवकुमारसारखे कसलेले कलाकार असतील, लता आणि भुपेंद्रसारखे गायक असतील आणि मदनमोहनसारखा संगीतकार असेल तर गाण्यात काय काय चमत्कार घडू शकतील हे पाहायचं असेल तर १९७५…

ये दिन क्या आये, लगे फूल हँसने…

आनंदी स्वरातला मुकेश हा आपल्या फार ओळखीचा नाही. कारण मुकेश म्हणजे दर्द असं जणु समिकरण बनून गेलंय. दिलिपकुमार, राज कपूरने ते जास्त घट्ट केलं. पण मुकेशने सुखी माणसांची गाणीही बरीच गायिली आणि ती लोकप्रियसुद्धा झाली. “ये दिन क्या आये” हे बासु चटर्जींच्या “छोटीसी बात” मधील एक दुर्मिळ म्हणता येईल असं गाणं. रेडियोवर फारसं वाजलेलं ऐकलं…

ये मुलाकात इक बहाना है, प्यार का सिलसिला पुराना है…

लता आणि खय्याम एकत्र आल्यावर चमत्कार घडतो असा अनुभव आहे. अगदी “रजिया सुल्तान” पर्यंत हा चमत्कारांचा पुराना सिलसिला सुरु राहिला होता. १९७९ साली आलेल्या “खानदान” चित्रपटाची कुणाला आठवण आहे का माहित नाही. मात्र त्यातील “ये मुलाकात इक बहाना है” हे गाणे अनेकांना आठवत असेल. हे नितांत सुंदर गाणे मला लता-खय्याम जोडीने दिलेल्या सुरेख गाण्यांमधले एक…