गळा मोती एकावळी काळी वो माय…!
एकदा नवरात्र असताना मंडपातून दुरून, अस्पष्टसे गाण्याचे स्वर ऐकू आले, “रात्र काळी, घागर काळी, यमुनाजळी ही काळी वो माय”. आवाज स्पष्ट नसल्याने ओरिजनल गाणे लावले आहे की नाही ते ओळखु शकलो नाही. मात्र चित्राने मूळ वस्तुची आठवण यावी त्याप्रमाणे गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकरांच्या या गाण्याने मन भूतकाळात निघून गेले. माझं काही गाण्यांनी असं होतं.…