लास्ट मॅन स्टँडिंग – You’re dead and you don’t know it.

अकिरा कुरोसोवाचा युजिंबो पाहायला मिळाला नाही. मात्र त्यावर बेतलेले चित्रपट अनेकवेळा पाहिले. त्यातला एक चित्रपट म्हणजे सर्जियो लियॉनोचा इतिहास घडवणारा क्लिंट इस्टवूड अभिनित “फिस्टफूल ओफ डॉलर्स”. पुढे ओळीने “फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर” आणि “द गुड, द बॅड अँड द अग्ली” हे सर्जिओचे आणखि दोन चित्रपट आले. आज वेस्टर्न पटात या तीन क्लासिक गणलेल्या चित्रपटांना…

अपालूसा

अगदी नवीन असे वेस्टर्नपट मला फारसे मानवत नाहीत. हा माझा मागासलेपणा असेल पण कठोर अशा निसर्गाशी जुळतील असे रापलेले चेहरेच आता दुर्मिळ झालेत. तो हेन्री फोंडा नाही, जॉन वेन नाही, चार्लस ब्रॉन्सन नाही आणि रँडॉल्फ स्कॉटही नाही. मात्र “अपालूसा” हा याला सणसणीत अपवाद. तसा हा पारंपरिक वेस्टर्न चित्रपट म्हणता येणार नाही. यात ती कुरणे नाहीत.…