मर्यादांचे भान
अलिकडेच काही कामासाठी विद्यापिठात गेलो होतो. आमचे समाजशास्त्राचे प्राध्यापक भेटले. ते निवृत्त झाले होते. ते ही काही कामासाठी आले असावेत. ते आपल्या गाडीत आणि मी बाहेर असा काहीकाळ सुखसंवाद झाला. अतिशय कडवे मार्क्सवादी असलेले सर आता काहीसे निराश वाटत होते. जीवनाला अर्थ नाही. आपण त्याला जो देऊ तोच अर्थ आणि तो देखील बरोबर असेलच असं…