किरातार्जुनीयम् चे देणे

संस्कृतातील अनेक नाटकांमधल्या अनेक गोष्टी आवडतात हे खरे असले तरी भारविच्या किरातार्जुनीयम् नाटकातील अकरावा सर्ग हा माझ्या फार आवडीचा आहे. मानसशास्त्राचा अभ्यास सुरु केल्यावर तर तो मला नुसता आवडीचाच नाही तर पुन्हा पुन्हा वाचण्याजोगा वाटू लागला आहे. आपण एखादी चांगली गोष्ट सुरु केल्यावर आपल्या समोर येऊन आपल्याला हतोत्साह करणारी अनेक माणसे असतात. काहीजण काळजीच्या नावाखाली…