मै दिल हूं इक अरमान भरा…

समाजशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून इतिहासकाळापासून जगात जे महत्वाचे बदल झाले त्यांचा आम्हाला अभ्यास करावा लागतो. म्हणजे भटक्या जमाती हळूहळू कमी झाल्या. लोक शेती करायला लागले. एका जागी स्थिर झाले. पुढे विज्ञानाचे युग आले, कारखानदारी सुरु झाली. जूने जग नाहीसे होऊ लागले. हिन्दी चित्रपटाचा इतिहास पाहू गेल्यास असेच बदल दिसू लागतात. अमिताभ युग सुरु होताना आद्य…