गॉडफादर आणि सोशल कॅपिटल
समाजशास्त्राचा विद्यार्थी असल्याने सामाजिक अंगाने चित्रपटांचा अभ्यास करणे ओघानेच आले. अशावेळी काही क्लासिक चित्रपटांमध्ये समाजशास्त्रातील सिद्धान्तांची बीजं मिळाली. ती तशी मिळणे ही घटना रोचक आणि आनंददायी होती. मग आपोआपच अभ्यासामुळे समाजशास्त्राच्या खुणा चित्रपट पाहताना शोधल्या जाऊ लागल्या. अर्थातच चित्रपटाच्या लेखक दिग्दर्शकाचा समाजशास्त्राचा अभ्यास असेल असे नाही या गोष्टीची मला जाणीव होती. मात्र या कलाकारांचा समाजाचा…